SAAHO TEASER : तुफान अॅक्शनचा खजिना

13
saaho-teaser

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा ‘साहो’ चित्रपटाचा टीझर हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. अॅक्शनचा खजिना या चित्रपटात खचाखच भरलेला असल्याचे टीझरवरून दिसते आहे. 1 मिनिट 39 सेकंदाच्या व्हिडीओला तासाभरातच 5 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

अभिनेता प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या दोघांची जोडी छान दिसते आहे, पडद्यावर यांची केमिस्ट्री चांगलीच रंगेल, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत. या दोघांसोबतच मंदिरा बेदी, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे यांची या चित्रपटातील पहिली झलक देखील पाहायला मिळते आहे.

बाहेर गोळीबारचा आवाज सुरू असतना श्रद्धा कपूर विचारते की ‘हे कोण आहेत’ त्यावर प्रभास म्हणतो की ‘फॅन्स आहेत’. त्यानंतर ती विचारते की ‘हे इतके आक्रमक का आहेत’, त्यावर तो कडक अंदाजात उत्तर देतो ‘ते डाय हार्ट फॅन्स आहेत’. त्यामुळे अॅक्शन सोबतच या चित्रपटात डायलॉग्ज देखील जबरदस्त ऐकायला मिळतील अशी आशा आहे.

साहो चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या बाहुबली – 2 या चित्रपटानंतर बऱ्याच काळाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आज टीझर रिलीज झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या