प्रभासने शेअर केलं साहोचं नवीन पोस्टर, असा आहे त्याचा लूक

66

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबलीच्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता प्रभास नवीन चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी साहो या चित्रपटाचं एक नवीन पोस्टर त्याने इन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. या पोस्टरवर प्रभास बाईकवर स्वार झालेला दिसत आहे. आतापर्यंत एकूणच साहोचे जे पोस्टर्स किंवा व्हिडीओ प्रदर्शित झालेत त्यात साहो ही अॅक्शन फिल्म असल्याचं दिसून येत आहे.

हा बिगबजेट चित्रपट सुजीतने दिग्दर्शित केला असून त्यात प्रभाससोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, एव्हलिन शर्मा, मंदिरा बेदी असे तगडे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या