प्रभासने शेअर केलं ‘Saaho’ चं पोस्टर

49

सामना ऑनलाईन। मुंबई

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या सुपरडुपर सिनेमातून लोकप्रियतेचा कळस गाठणारा दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी ‘साहो’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

तुम्हा सगळ्यांसाठी सादर आहे माझ्या साहो चित्रपटाचं हे पोस्टर. 15 ऑगस्टला थिएटरमध्ये भेटूया असेही त्याने त्याखाली लिहलं आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, एवलिन शर्मा, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. साहोचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या