लोकसभा निवडणूक लढवणार नाही – प्रफुल्ल पटेल

सामना प्रतिनिधी । नागपूर

या लोकसभा निवडणुकीत भंडारा, गेंदिया लोकसभा क्षेत्रात पटेल परिवारापैकी मी स्वतः किंवा माझी पत्नी वर्षाबेन यांच्यापैकी कोणीही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा बुधवारी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.