75 हजार श्रीमंतांचे परदेशात स्थलांतर

सामना ऑनलाईन । नागपूर

रुपयाची सातत्याने घसरण सुरू असून हिंदुस्थानी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारचे दमनकारी धोरण जबाबदार असल्याची टीका भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. देशातील 75 हजार श्रीमंत लोकांनी दुसऱया देशात स्थलांतर केल्यामुळे रुपयाची घसरण होऊन देशात डॉलरची कमतरता जाणवत आहे. आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. वर्ल्ड वेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आर्थिक स्थितीवर सपशेल अपयशी ठरल्याचे सांगितले.

ऑर्गनायझेशननुसार देशात ज्यांचे उत्पन्न 10 कोटीपर्यंत आहे त्यांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी हजारो हिंदुस्थानी दरवर्षी दुसऱया देशात स्थलांतर करीत असतात. 2015 मध्ये स्थालांतरित होणाऱया हिंदुस्थानींची संख्या ही 4 हजार होती तर 2015 मध्ये ही संख्या 6 हजारांवर पोहचली आहे.