शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत !


सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाकयुद्ध अद्यापही सुरू आहे. शरद पवार हे धादांत खोटं बोलत आहेत. पवार यांनी एवढंही खोटं बोलू नये अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. याआधी शरद पवार यांनी, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकर खासदार झाले असे म्हटले होते. यानंतर सोमवारी पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत पवारांवर टीका केली.

पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी खासदार झालो तेव्हा आमचा समझोता त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्यासोबत झाला होता. यात शरद पवार कुठेही नव्हते. तसेच त्यांनी वैयक्तीक पातळीवर उतरू नये असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

याआधी यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत परंतु त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असे म्हटले होते. त्यानंतर आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात 2 निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडरकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. त्या ठिकाणी शरद पवार नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. तेव्हा ते धर्मनिरपेक्ष वाटत होते पण आता वाटत नाही,’ असा टोला पवारांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.