होतकरू : चित्रशिल्पाचा ध्यास

147

चित्र आणि शिल्प हा प्रणित घाटे याच्या केकळ डीचा विषय नसून तो त्याच्या जीवनाचा ध्यासच बनला आहे. म्हणूनच तर सिरामिक्ससारख्या क्लिष्ट माध्यमात तो अत्यंत कुशलतेने कलाकृती बनवतो.

hotkaru_-_pravin_ghate_11चित्र आणि शिल्प ही कलेचीच असली तरी दोन वेगवेगळी माध्यमं… पण प्रणित घाटे हा तरूण या दोन्हीमध्ये सहज मुशाफिरी करतोय. सध्या हा होतकरू तरूण रचना संसद येथे फाइन आर्ट्स विभागात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचा कलाप्रवास त्याच्या बालवयापासूनच सुरु झाला. बालपणी पेन्सील हातात घेतल्यापासून त्याने चित्रे रेखाटायलाच सुरुवात केली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नाशिकला पूर्ण केल्याकर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे त्याने पुढील शिक्षण घेतले. तेथे सिरॅमिक विभागात शिकत असताना त्याने अनेक पुरस्कार पटकाकले. येथून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर 2 वर्षे ‘अमेरिकन राज्यक्रांतीच्या ऐतिहासिक’ पुस्तकात बोधचित्रेही काढली. त्यानंतर 2011 पासून आता तो रचना संसद येथे कलाशिक्षक म्हणून काम करतोय..

विशेष म्हणजे चित्रकलेसोबत गायन, बासरीकादन, अभिनय, वाचन अशा अनेक कलांची जपणूक त्याने आजवर केली आहे. त्याच्या आई वडिलांकडून त्याला या सर्व कला वारसा म्हणून मिळाल्यात. भविष्यात कलेच्या क्षेत्रात नक्की भवितव्य काय हे माहीत नसतानाही पालकांनी त्याला आपल्यापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी पाठवले. त्याच्या या प्रवासात त्यांना अनेक मित्रांची आणि कलाकारांची साथ लाभल्याचं तो सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या