आजचा निकाल एक प्रकारे त्सुनामीच – प्रतापराव जाधव

267

राजने देशमाने । बुलढाणा

विकासासोबत देशाची सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार करु शकते. हा विश्वास जनतेला असल्यामुळे जनतेने मला भरभरुन मतदान करुन निवडून तर दिलेच परंतु सर्व अंदाज फेल ठरवत एनडीएला 341 जागा मिळवून देत एक प्रकारे त्सुनामी आल्याचे चित्र या निकालाने उभे केल्याची प्रतिक्रिया बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे विजयी खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

खासदार प्रतापराव जाधव यांनी आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी केंद्रात भेट देवून मतमोजणी प्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या भेटी घेत आभार व्यक्त केल्यानंतर बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेली विकास कामे पाहता मतदारांनी मुल्यमापन करत एनडीए मधील सर्वच घटक पक्षाला भरभरुन जागा देत एक प्रकारे त्सुनामी आली आहे. यामध्ये विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. असे सांगत मोदी फॅक्टर हा जबरदस्त चालला आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिसर्‍यांदा मला उमेदवारी देत जो विश्वास दाखवला त्यामुळेच मी मतदारांच्या आर्शीवादामुळे मोठा विजय संपादन करु शकलो, मला बुलढाणा लोकसभेची तिसर्‍यांदा निवडणूक लढताना अ‍ॅन्टी इन्कम्बशी वाटली नाही, माझा जनतेशी असलेला संपर्क व विकास कामे याचे मूल्यमापन जनतेने करुन मला भरघोस मतदान करुन विजयी केले आहे. याचे श्रेय मतदारांबरोबरच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आहे. वंचित आघाडी बाबत बोलताना खासदार जाधव म्हणाले की, वंचितने बुलढाणा मतदार संघात जबरदस्त ताकद दाखवली असून यापुढे विधानसभेत आमची लढाई काँग्रेस, राष्ट्रवादीशी नसून वंचित आघाडी सोबत असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या