मुंबई, ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाची फटकेबाजी

54

सामना ऑनलाईन, मुंबई

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटासह आज मुंबई, ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. घामाच्या धारांनी हैराण झालेल्या चाकरमान्यांनी पावसात भिजत धारानृत्याचा आनंद लुटला. या पावसामुळे कळवा, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरात बत्ती गुल झाली होती. तर कोपर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफमधून ठिणग्या उडाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मुंबई विमानतळावरही पावसामुळे विमानांची फेंफे उडाली. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की तब्बल 11 विमानांचे मार्ग बदलावे लागले.

लक्षद्वीप आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात उद्या मंगळवारी वादळी पावसाचा अंदाज  हवामान खात्याने वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या