प्रीतीचे बॉलिवूडमध्ये  पुनरागमन 

सामना ऑनलाईन।मुंबई

लग्नानंतर बॉलिवूडमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात असलेली बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा तिच्या नवऱयाच्या सांगण्यावरुन बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. प्रीती सनी देओलच्या ‘भैय्याजी सुपरहीट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची ती आतुरतेने वाट बघत आहे.

प्रीती गेल्यावर्षी तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत लग्नाच्या बंधनात अडकली. ‘लग्नानंतर अमेरिका व मुंबई असा सततचा प्रवास त्रासदायक ठरत होता पण त्यातही मला आनंद वाटत होता.  पण मधल्या काळात मी बॉलिवूड सोडण्याचा विचारात होते. पण जेनने मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी बॉलिवूडमध्ये परतले. मी खूप भाग्यवान आहे की मला जेन सारखा नवरा मिळालाय.’ असे प्रीतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले

प्रीती 2013 साली ‘ईश्क ईन पॅरिस’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. प्रीती या चित्रपटाची निर्माती देखील होती. त्यामुळे हा चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे तिला बरेच नुकसान सहन करावे लागले होते.