प्रेग्नंट नेहा धुपियाने केला रॅम्प वॉक

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री नेहा धुपियाने नुकतीच तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली आहे. लवकरच आई बाबा होणाऱ्या नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी शनिवारी लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक केला. बेबी बंपसोबत रॅम्प वॉक करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता नेहा धुपियाचे नाव देखील जोडले गेले आहे. पायल सिंघल या डिझायनरसाठी नेहाने तिचा नवरा अंगद बेदीसोबत रॅम्प वॉक केला.