भयंकर ! गर्भवती तरुणीची हत्या केल्यानंतर गर्भातून काढलं अर्भक

6

सामना ऑनलाईन। शिकागो

अमेरिकेतील शिकागो येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे तीन जणांवर एका गर्भवती महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या गर्भातून अर्भक काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ओचाओ लोपेज असे मृत महिलेचे नाव असून तिचे अभर्कही दगावले आहे.

क्लारिसा फिग्युरोआ आणि तिची मुलगी डेसीरी यांनी ओचाओ या महिलेला सामान देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले होते. ओचाओ गर्भवती होती त्यामुळे तिच्या बाळाला उपयुक्त अशा वस्तू आपल्याकडे आहेत, असे त्यांनी तिला सांगितले. पण ओचाओ त्यांच्या घरी जाताच क्लारिसा, डेसीरी आणि क्लारिसाच्या प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच त्यांचे कौर्य थांबले नाही तर त्यांनी ओचाओच्या गर्भातून जन्माला न आलेल्या बाळाला बाहेर काढले. त्यानंतर तिघे घाबरले व त्यांनी हेल्पलाईनवर फोन करून क्लारिसाने एका नवजात बाळाला जन्म दिला असून ते श्वास घेत नसल्याचे सांगत मदत मागितली. त्यानंतर मदत पथकाने बालकाला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना क्लारिसाला घाम फुटला. यामुळे डॉक्टरांना संशय आला व त्यांनी याबद्दल पोलिसांना सांगितले. नंतर पोलिसांनी क्लारिसाच्या घराची झडती घेतली असता त्यांना कचऱ्याच्या डब्यात ओचाओचा मृतदेह सापडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आपली प्रतिक्रिया द्या