दोन जीवांची

 

गरोदरपणातील आहार… हा प्रत्येक आईसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी अतिशय जिह्याळ्याचा विषय… आई आणि मूल दोघांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता चौरस आहार महत्त्वाचा आहे… दोन जीवांची म्हणून बऱ्याचदा जास्त खाण्याचा सल्ला गरोदर स्त्रीला दिला जातो… मात्र असे केल्याने आई आणि बाळ दोघांचेही आयुष्य धोक्यात येऊ शकते… यासाठी आईचे आरोग्य आणि पोटातील बाळाच्या वाढीसाठी आहाराविषयी सावध असणे गरजेचे आहे.

सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये पोटातील बाळाच्या अवस्था, अवयवांमध्ये होणारे बदल यामुळे मळमळ, थकवा किंवा सकाळचा थकवा येऊन अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे या काळात शरीरात ऊर्जा वाढेल असा आहार घेणे महत्त्वाचे आहे. दुसऱया तीन महिन्यांमध्ये बाळाची वाढ आणि विकास होत असल्याने बाळाचे योग्य पोषण होईल असा आहार घ्यावा. तिसऱया तिमाहीमध्ये बाळाचा जन्म आणि प्रसुतीवेदना यासाठी तयार होत असल्याने नेहमीपेक्षा ५० कॅलरीज अधिक वाढवणे गरजेचे आहे.

तुमच्या पोटात जर दोन बाळ असतील तर अशा वेळी ३०० पेक्षा जास्त कॅलरीज sघेणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.  गरोदरपणात वाढीव आणि पुरेशा कॅलरीज घेण्यासाठी तीन वेळा जेवणे, दोन वेळा नाश्ता यासोबत दिवसभरात सहा वेळा थोडेसे पण योग्य खा, पण कॅलरीज वाढवण्यासाठी जास्त न जेवणे बाळ आणि आईच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते.

गरोदरपणातील आहार

जाणिवपूर्वक तुमच्या आहारात भाज्या, फळे, निरनिराळ्या डाळी, कडधान्ये, तृणधान्ये, दुधाचे पदार्थ, सुकामेवा, अंडी यांचा समावेश करा. तुम्ही मांसाहारी असाल तर मटण व्यवस्थित शिजवून खा. ते कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या.

अति का खाऊ नये ?

गरोदरपणात अति प्रमाणात खाल्ल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अतिप्रमाणात आहार घेतल्यास वजन अधिक वाढते. त्यामुळे गरोदरपणातील मधुमेह, गर्भारपणातील इतर अनेक समस्या, सी-सेक्शन  होण्याची शक्यता असते.

कोणते पदार्थ टाळाल ?

सॅच्युरेटेड फॅटस् असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा. त्याचप्रमाणे पाश्चराईज्ड न केलेले दूध व दुधाचे पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ, रस्त्यावर विकत मिळणारे पदार्थ, तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

आहारात वाढीव ३०० कॅलरीज कशा मिळवाल ?

>नाश्ता करताना अंडी खा. ७७ कॅलरीज मिळतील.

>जेवणात १ वाटी डाळ प्या. २०० कॅलरीज मिळतील.

>दही घेतल्यास कॅल्शियम आणि १०० कॅलरीज मिळतील.

>फळातून १०० कॅलरीज मिळतील.

>मूठभर सुकामेवा खा.