आशाताईंच्या आवाजातलं ‘हे’ नवीन गाणं ऐकलंत का?

सामना ऑनलाईन । मुंबई

श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटातलं एक नवीन गाणं रिलीज झालं असून या गाण्याला दस्तुरखुद्द आशा भोसले यांचा आवाज लाभला आहे. ‘प्रेम में तोहरे’ असे बोल असलेल्या या गाण्याला आशाताईंच्या आवाजाने चारचांद लागले आहेत. अन्नु मलिक यांचं संगीत असलेल्या या गाण्याचे बोल कौसर मुनीर यांचे आहेत. विद्या बालन अभिनित बेगम जान येत्या १४ एप्रिलला रिलीज होत आहे.

एकूणच ‘प्रेम में तोहरे’ या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटाच्या पार्श्वगायनाला ‘आशा’ मिळाली आहे. पाहा आशाताईंच्या आवाजातलं हे गाणं-