गज्वींच्या एकांकिका

2

नाटय़संमेलनाअध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिकांचा शुभारंभ उद्या होतो आहे.

समाजातील विदारक सत्य प्रभवीपणे मांडणारे सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि नाटककाकर प्रेमानंद गज्वी… माणूस-समाजातील आंतरव्यवस्थेचा वेध त्यांच्या एकांकिकांतून घेतला जातो. ग्रामीण जीवनातील जातीय गुंता, देवदासींच्या समस्या, वेठबिगारांचा मुक्तिसंघर्ष अशा अनेक विषयांवरील त्यांच्या एकांकिकांचे विषय आजही ताजे वाटतात. अशा काही सामाजिक समस्यांवर विचार करायला लावणाऱया ‘घोटभर पाणी’, ‘कृष्णविवर’ आणि ‘देवनवरी’ या गाजलेल्या एकांकिका प्रेक्षकांना नव्याने पाहता येणार आहेत. उद्या शिवाजी मंदिर येथे रात्री 8 वाजता ‘गज्वीझम’ हा एकांकिकांच्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

एकांकिकांच्या या अनोख्या प्रयोगाविषयी दिग्दर्शक दिवाकर मोहिते सांगतात, प्रेमानंद गज्वी त्यांच्या लिखाणातून सामाजिक विषयांवर भाष्य करतात. त्यांनी लिहिलेल्या सामाजिक लिखाणाचं एकत्रितरीत्या सादरीकरण व्हावं, प्रेक्षकांनाही ते एकाच रंगमंचावरून बघता यावं हा या एकांकिकांच्या प्रयोगाचा मूळ हेतू आहे. या तीन एकांकिका गाजलेल्या असून प्रत्येक एकांकिकेचा विषय वेगवेगळा आहे.

नाटकाचे जुने विषयही सशक्त

एकांकिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांचे सांगणे आहे की, नवीन विषयांवर नाटकांचं सादरीकरण होतच असतं, त्यामुळे ते बघू नका असं नाही तर जुनंही तितकच चांगलं आहे. जे विषय कोणत्याही काळासाठी आवश्यक आहेत ते विषयही प्रेक्षकांनी बघावेत. जे सडेतोडपणे प्रेमानंद गज्वी यांनी एकांकिकेचे लिखाण केले आहे ते प्रेक्षकांनी बघावे आणि तितक्याच सडेतोडपणे त्यावर विचार करावा. शिवाय त्यांच्या लिखाणात कुठेही बदल करता येत नाही इतके ते परिपूर्ण आहे. दिग्दर्शनाच्या माध्यमातून एकांकिकेचे हे तिन्ही संच नवीन आहेत. यानंतरही त्यांच्या नवीन एकांकिका घेऊन आम्ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.