चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी दीड लाख मतदान यंत्रे सज्ज

2

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 29 एप्रिल रोजी राज्यातल्या 17 मतदारसंघांत मतदान होत आहे. यामध्ये 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट मशीन्स तयार ठेवली आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱया मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱया सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

मतदारसंघ व मतदारांची संख्या
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या 17 लोकसभा मतदारसंघांत सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदान होईल.

मतदान यंत्रे तयार
या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्रे आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

तृतीयपंथी मतदार
मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

कुठे किती मतदार…
नंदुरबार – 18 लाख 70 हजार 117 (पुरुष- 9 लाख 43 हजार 745 , महिला- 9 लाख 26 हजार 350.
धुळे – 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903, महिला-9 लाख 10 हजार 935.
दिंडोरी – 17 लाख 28 हजार 561 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82, महिला- 8 लाख 27 हजार 555.
नाशिक – 18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892, महिला- 8 लाख 93 हजार 139.
पालघर – 18 लाख 85 हजार 279 (पुरुष- 9 लाख 89 हजार, महिला- 8 लाख 96 हजार 178.
भिवंडी – 18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752, महिला- 8 लाख 51 हजार 921.
कल्याण – 19 लाख 65 हजार 131 (पुरुष- 10 लाख 61 हजार 386, महिला 9 लाख 3 हजार 473.
ठाणे – 23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379, महिला- 10 लाख 76 हजार 834.
मुंबई उत्तर – 16 लाख 47 हजार 208 (पुरुष- 8 लाख 90 हजार, महिला – 7 लाख 56 हजार 847.
मुंबई उत्तर-पश्चिम – 17 लाख 32 हजार (पुरुष- 9 लाख 50 हजार 302, महिला- 7 लाख 81 हजार 765.
मुंबई उत्तर-पूर्व – 15 लाख 88 हजार 331 (पुरुष- 8 लाख 64 हजार 646, महिला- 7 लाख 23 हजार 542.
मुंबई उत्तर-मध्य – 16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627, महिला- 7 लाख 63 हजार.
मुंबई दक्षिण-मध्य – 14 लाख 40 हजार 142 (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला – 6 लाख 62 हजार 337.
मुंबई दक्षिण – 15 लाख 53 हजार 925 (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781.
मावळ – 22 लाख 97 हजार 405 (पुरुष- 12 लाख 2 हजार 894, महिला- 10 लाख 94 हजार 471.
शिरूर – 21 लाख 73 हजार 527 (पुरुष- 11 लाख 44 हजार 927, महिला – 10 लाख 28 हजार 656.
शिर्डी – 15 लाख 84 हजार (पुरुष- 8 लाख 21 हजार 401, महिला – 7 लाख 62 हजार 731.