पंढरपूरमधील लाडू प्रसाद महागला

सामना ऑनलाईन, पंढरपूर

विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये मंदिर व्यवस्थापनाने ५० टक्के वाढ केलीय. या दरवाढीमुळे दहा रुपयांत मिळणारे दोन लाडू आता पंधरा रुपयांना घ्यावे लागतील. नव्या लाडूंची चव आणखी लज्जतदार केली असून, वजन अधिक असल्याने दरवाढ करण्यात आली आहे. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे आणि साखरेचे फुटाणे, बत्तासे दाखविण्याची प्रथा होती. आजही ती कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने बुंदीच्या लाडू प्रसादाची विक्री सुरू केली. तिरुपतीच्या धर्तीवर सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाला वारकरी भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नवीन वर्षांपासून मंदिर समितीने लाडूच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण बदल केले. अगदी प्रसादाचे पावित्र्य राखण्यापासून त्याचे साहित्य उच्च दर्जाचे असेल याची दक्षता घेतली आहे, तसेच लाडू तयार करणाऱया कर्मचाऱयांच्या आरोग्याची दक्षता घेतली आह़े