बुडाला…रुपया पूर्ण बुडाला!

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अच्छे दिन’चा ढोल बडवणाऱ्या भाजप सरकारने आपला कार्यकाल पूर्ण करताना अवघ्या हिंदुस्थानला महागाईच्या खाईत ढकलण्याचा जणू पणच केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, खनिज तेलाचे वाढलेले दर याचा परिणाम म्हणून रुपया बुडाला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली असून त्याची सध्याची किंमत ६७ रुपये १३ पैसे प्रतिडॉलर इतकी झाली आहे.

रुपया घसरण्याची आणखी कारणे-

  • खनिज तेलाचे दर वाढले
  • पश्चिम आशियातील वाढता तणाव
  • आरबीआयने सरकारी बाँड विकत घेण्याची केलेली घोषणा
  • व्हेनेझुएलातील अंतर्गत राजकारण