…आणि मोदींनी ‘त्या’ मुलीचं कौतुक केलं

सामना ऑनलाईन । केदारनाथ

आपल्याला साद घालणाऱ्या जवानाच्या मुलीला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट त्यांच्याजवळ पोहोचले आणि कौतुकाने विचारपूस करत तिला शाब्बासकी दिली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयानंतर आज पहिल्यांदा केदारनाथ मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली. तेव्हा मोदींना भेटण्यासाठी झालेल्या गर्दीचं लक्ष या मुलानं खेचून घेतलं.

उत्तराखंडमध्ये तीन वर्षांपूर्वी ढगफुटी आणि प्रलयंकारी पाऊस झाला होता. यामध्ये चार धाम यात्रेतील महत्वाचे आणि पवित्र तीर्थस्थळ केदारनाथच्या परिसराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर केदारनाथच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आणि तब्बल तीन वर्षांनंतर हे मंदिर सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. पवित्र मंत्रोच्चारात त्यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. मोदींनी यावेळी केदारनाथ मंदिराची परिक्रमा देखील केली.

मोदींना बघण्यासाठी जमलेल्या यात्रेकरूंनी गर्दी केली. मोदींनी देखील सर्वांना अभिवादन केले. मात्र या गर्दीमध्ये एक छोटी मुलगी जवानाच्या कडेवर बसून मोदींना आवाज देत होती. त्याकडे मोदींचं लक्ष गेलं आणि त्यांनी थेट त्या जवानाजवळ जाऊन त्या मुलीचा पापा घेतला, चौकशी केली, कौतुकानं शाब्बासकी दिली. तिथे उपस्थित लष्कराचे जवान, मीडिया आणि तेथील यात्रेकरूंनी हा क्षण कॅमेऱ्यात टीपला.

पाहा व्हिडिओ: