प्रिन्स नरूला आणि युविकाचा चौधरीचा झाला साखरपुडा


सामना ऑनलाईन । मुंबई

रोडीज, स्प्लिट्सविला आणि बिग बॉस या तीन रिअॅलिटी शोचा विजेता ठरलेला प्रिन्स नरूला याचा अभिनेत्री व त्याची बिग बॉसमधील सह स्पर्धक युविका चौधरीसोबत साखरपुडा झाला आहे. प्रिन्स आणि युविकाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

प्रिन्सने रोडीज आणि स्प्लिट्सविला हे तरूणाईचे आवडते रिअॅलिटी शो जिंकल्यामुळे तरुणांमध्ये त्यााची फार क्रेझ आहे. प्रिन्स आणि युविका हे बिग बॉसच्या घरात एकत्र आले होते. तेथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेली तीन वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कधीच औपचारिकरित्या प्रेमाची कबूली दिलेली नाही. मात्र आता त्यांनी साखरपुडा केल्याचेच जाहीर केले आहे. दोघांनीही साखरपुड्यांच्या अंगठ्या दाखवणारे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रिन्सने शेअर केलेल्या फोटोत त्याने साखरपुडा झाल्याचे सांगत युविकासोबत लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

प्रिन्स आणि युविकाने २३ जानेवारी रोजी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. प्रिन्ससाठी २३ जानेवारी ही तारीख लकी आहे. याच दिवशी त्याने बिग बॉस जिंकले होते. त्यामुळे याच दिवशी त्याने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता, असे त्याच्या जवळील सूत्रांकडून समजते