‘उंच माझा झोका’मध्ये धमाल

स्त्रियांनी सर्व मतभेदांचा आणि रूढी परंपरांनी जखडलेल्या समाजाचा सामना करत स्वत:साठी, इतर स्त्रियांसाठी व समाजसुधारणेसाठी लढा दिला आणि आपल्या त्यांच्या उदात्त कार्याने एक ठसा उमटकला अशी पुरुषप्रधान समाजात अनेक उदाहरणे आहे. या स्त्रियांना सन्मानित करण्याचा झी मराठी वाहिनीचा एक निष्ठावान प्रयत्न म्हणजे ‘उंच माझा झोका’ पुरस्कार. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील तारकांनी चारचाँद लावले. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने अंगावर काटा आणेल अशा प्रेरणादायी गाण्यांवर नृत्य सादर केले.