‘पुशिं’ची ‘सावित्री’ साकारताना…


>>प्रिया जामकर

पु. शि. रेगेंची सावित्री ही नायिकाप्रधान कादंबरी. एका तरुण आणि कविमनाच्या स्त्राrने एका समवयीन आणि विद्वान जिवलग सुहृदाला लिहिलेल्या पत्रांचा संच म्हणजे ही कादंबरी. जी सावित्री या नाटकातून उलगडतेय. या नाटकातील शीर्षकभूमिका साकारणाऱया अभिनेत्रीने मांडलेला हा प्रवास.

वित्री’ कादंबरीचा बीएला असताना माझ्यावर ठसा नव्हता. म्हणजे ‘मोर हवा तर आपणच मोर व्हायचं’ या वाक्याचा मंत्र माझ्यावर नव्हता. पुढे मी एसएनडीटीमध्ये शिकवू लागले तेव्हा मला ‘सावित्री’ कादंबरी शिकवायची होती. म्हणून मी या कादंबरीचं सूक्ष्म वाचन सुरू पेलं. या वेळी मात्र मला ती आवडली. या बाईला मुक्तीच्या अनेक चोरवाटा, भुयारं गवसली आहेत याचा सुगावा मला लागला. शिवाय रेगेंनी ज्या पक्पेपणानं तिची बांधणी पेली आहे तेही मला इंटरेस्टिंग वाटलं, पण माझा जो नेहमीचा छंद होता काr, मोठय़ानं वाचून आनंद लुटायचा, ते मी अजूनही पेलं नव्हतं. अगदी सावकाश ‘सावित्री’ चिंतनात उतरत होती.

रवींद्र लाखेंनी मला ‘‘तू ‘सावित्री’ करशील का?’’ असे विचारले. माझा जीव अर्थातच दडपला. एकतर मी कधीच नाटक पेलं नव्हतं. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याकडे मी दूरदर्शन मालिका आणि चित्रपटामधून थोडाफार अभिनय पेला होता. कमल देसाईंच्या ‘श्राद्ध’ या कथेतील ‘सुब्बी’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला सुमित्राताई आणि सुनीलने दिली होती. मी ‘सावित्री’ साकारण्यास तयार आहे हे म्हणायचं धाडस व्हायलाच सहा महिने गेले. ‘सावित्री’ साकार करणं हे रवीचं आयुष्यभराचं स्वप्न होतं. आयुष्यभर उराशी स्वप्न बाळगलेला हा माणूस, त्याला घाई नव्हती. तो मला म्हणे, ‘‘भरपूर वेळ घे.’’ एकदा करायचं ठरवल्यावर मात्र तयारी सुरू झाली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कमल देसाईंच्याच कथांच्या अभिवाचनाची एक ध्वनिमुद्रिका पेली. ज्यामुळे बोलायचं कसं हे मला रवीकडून शिकता आलं.

‘सावित्री’ साकार करण्याचा हा प्रवास थरारक होता. एकतर पाठांतराचा भाग…पण तो पार पडला. रोज थोडं थोडं करून…पण माझ्या डोळ्यांसमोर काहीच यायचं नाही, किंबहुना गोंधळच असायचा. एक साहित्यपृती म्हणून सावित्रीचा विचार करणं वेगळं नि आता ती रंगमंचावर साकार करायची आहे ही घटनाच वेगळी. यामध्ये नाटय़ कुठे आहे? हे एकटीने सादर कसं करायचं? मलाच जर पंटाळा आला तर? रवीला ही कादंबरी का बरं सादर करायची आहे? नि मुळात मी हे का करते आहे? असे हजारो प्रश्न सतत मला भंडावून सोडत होते. ‘सावित्री’ ही कादंबरी रंगमंचावर मला अशी अशी दिसते असं एक दिग्दर्शक म्हणून रवीने कधीच सांगितलं नाही. ‘सावित्री’ ही मराठीतील एक अभिजात कादंबरी आहे नि ती मला रंगमंचावर सादर करायची आहे. बस्स! इतपंच!! त्यामुळे सावित्री मुखोद्गत करून मी एका काळोखाच्याच स्वाधीन व्हायला तयार झाले होते. बरं, मी तरी का करत होते? नाटक काsणी का करत असेल? मला वाटतं, मरायला! मरून जगू पाहण्याच्या ऊर्मीपायी. सावित्री साकार करण्याच्या प्रक्रियेत मी माझ्यातली अस्वस्थता रिचवली आणि शांत झाले का? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्ही आहे. आपल्या कलेला दाद मिळाली काr, बरं वाटतं, पण तो बरं वाटण्याचा क्षण शाश्वत नसतो हे खिन्न करणारं आहे, पण हा वेगळा विषय.

रवी जसजसा एपेक पत्र उलगडत गेला तसा मला हळूहळू अंदाज येत गेला. अर्थात अडथळे खूप होते. नाटक या माध्यमाची एक गोष्ट मला खूप डेंजरस नि म्हणूनच इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे नाटक तुमचे अनेक समज, मतं, गंड, स्वभावदोष, दृष्टिकाsन मोडतं, फोडतं… दुसऱया बाजूनं ते तुमच्यातल्या अनेक शक्यताही अजमावण्याची संधी देतं…‘सावित्री’ साकार करताना मला साहित्याची बरी समज आहे ही गोष्ट फायद्याची ठरली असं इतरांप्रमाणे मलाही वाटत होतं. ते काही अंशी खरं आहेदेखील, पण तो अडथळा पण ठरत होता. साहित्याची तथाकथित समज बाजूला ठेवून या प्रयोगाकडे बघणं हे सतत करावं लागलं.

एखाद्या नटानं एखादी व्यक्तिरेखा बरी साकार पेली तर ती भूमिका नट जगला असं म्हणण्याचा प्रघात आहे, पण असं नसावं. मी जेव्हा माझी सावित्रीशी तुलना करते तेव्हा मला माझं जगणं हे अधिक आव्हानात्मक वाटतं. मी सावित्री नाही. ते कठीण आहे किंवा सावित्री मी नाही. कारण तेही कठीणच आहे, पण एक सहसंवेदना असते. मला पुनः पुन्हा तिचा हात हातात घेऊन तिच्या नाडीचे ठोके अनुभवावे वाटतात. तिच्या काळजातून फिरावे वाटते, अगदी निकट नि मग मी एका भासविश्वात वावरू लागते, जे मला तेव्हा खरे वाटत असते. कारण ते खरेच असते. असं काहीतरी अजब गुंतागुंतीचं रसायन असावं ते.

रवीला एक दिग्दर्शक म्हणून तिचं आनंदभाविनी रूप साद घालत होतं. तो मला सतत म्हणायचा काr, ती आनंदभाविनी आहे. तो रेंगेंसारखाच पल्याड पोचून हे म्हणत होता का? रेगे आणि रवी दोघांनीही आप्पांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता का? तिन्ही पुरुष तिला एकाच विशाल नजरेतून पाहत होते का? पण मी अस्वस्थ होते. कारण मला आनंदभाविनीची निखळ प्रचीती येत नव्हती. मला तिचे संयत का होईना, पण कढ जाणवायचे. विरहाची एक खोल पीडा जाणवायची. खरं सांग, तू आनंदभाविनी आहेस का? हा प्रश्न मी कितीदा तरी विचारला आहे. तिच्या आनंदभाविनी होण्याच्या प्रक्रियेचा शोध घेण्याचा मी प्रयत्न पेला आहे नि तो अजूनही करतेच आहे.

[email protected]