प्रियांका चोप्रा आता धापवटू बनणार ?

सामना ऑनलाईन ,मुंबई

बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा हीने अभिनयासोबत गायन, दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे पेलल्या आहेत. आता प्रियांका एका वेगळ्या भूमिकेत शिरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेली माहिती खरी ठरली तर ती धावपटूच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळू शकेल

बॉलीवूडमध्ये सध्या अशी चर्चा आहे की मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपटानंतर प्रियांका पुन्हा एकदा बायोपिकमध्ये दिसणार आहे. तिला प्रसिद्ध धावपटू पी.टी.उषा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात काम करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.

पी.टी.उषा यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाचं बजेट १०० कोटींपेक्षा जास्त आहे. सुप्रसिध्द संगीतकार ए. आर.रहमान यांनाही सिनेमासाठी विचारण्यात आलं आहे.  मात्र, अजून या दोन्ही कलाकारांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.