प्रियंका चोप्राला व्हायचंय आई

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्यंतरी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला दिवस गेले असल्याची चर्चा सुरू झाली होती. कारण तिने परिधान केलेल्या ड्रेसमधून बेबी बंप दिसत असल्याची चर्चा होती. तिचा हा फोटो व्हायरल झाला आणि ती गरोदर असल्याच्या वावड्या उठल्या. पण नंतर प्रियंका आणि तिच्या आईने या गोष्टीत काहीच तथ्य नसल्याचे आणि ही एक अफवा असल्याचे सांगितले. मात्र आता एकीकडे मदर्स डे साजरा होत असतानाच प्रियंकाने एका मुलाखतीत आपल्याला आई व्हायचंय अशी गोड इच्छा व्यक्त केली आहे. याबरोबरच तिने फॅमिली प्लॅनिंगबाबत आपले मतही व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील एका मुलाखतीत ‘तू तुझी फॅमिली कधी वाढवणार’, असा सवाल तिला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली, मला असा प्रश्न अनेकदा विचारतात. माझ्या मित्रांनाही मुलं आहेत, त्यामुळं आता तूसुद्धा मुलांचा विचार कर असा सल्ला अनेकजण देत असतात. मलाही आई होण्याचा आनंद आणि अनुभव घ्यायचा आहे, असंही तिने स्पष्ट केलं. याआधी निक यालाही फॅमिली प्लॅनिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ‘मला बाबा व्हायला नक्कीच आवडेल, तो अनुभव मला एन्जॉय करायचा आहे, आयुष्यात आलेला अनुभव मला मुलांसोबत शेअर करायचा आहे’ असे तो म्हणाला होता.