स्मृती इराणींनी अमेठीत चपला वाटून जनतेचा अपमान केला : प्रियंका गांधी

priyanka-gandhinagar

सामना ऑनलाईन । अमेठी

स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये चपला वाटून जनतेचा अपमान केला असे वक्तव्य काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच यातून इराणी यांनी राहुल गांधींना खिजवण्यासाठी केल्याचेही प्रियंका गांधी म्हणाल्या. फुरसतगंजमधील एका सभेत त्या बोलत्य होत्या.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, “स्मृती इराणी यांनी यासाठी चपला वाटल्या यासाठी की त्यांना वाटतं की अमेठीत लोकांकडे साधी चप्पल नाही. हे असे करून त्यांना वाटेल की त्या राहुलचा अपमान करत आहेत. खरं तर त्यांनी अमेठीचा अपमान केला आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेने कुणाकडेच भीक नाही मागितली.” तसेच “तुम्ही आता इराणींना धडा शिकवा की अमेठी आणि रायबरेलीची जनतेचा स्वाभिमान जागा आहे, ते कुणाकडेही भीक मागत नाहीत. जर कुणाला भीक मागायाची असेल तर त्या लोकांनी तुमच्याकडे मताची भीक मागुद” असेही प्रियंका म्हणाल्या.

स्मृती इराणी अमेठीत गेल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितले की अमेठीतल्या एका गावाचा सरपंच त्यांना दिल्लीत भेटला होता. तो आला तेव्हा त्याच्या पायात चप्पलही चांगली नव्हती. तेव्हा मी त्यांना चांगल्या चपलेची व्यवस्था करून दिली आणि गावाच्या विकासासाठी 16 कोटींचा निधी मिळवून दिला.