प्रियंकांच्या रोड शोमध्ये ‘राफेल’ उडाले, ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी

66

सामना ऑनलाईन । लखनौ

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मोठा रोड शो आयोजित करण्यात आला होता. लखनौच्या रस्त्यांवर तब्बल 15 किलोमीटरपर्यंत हा रोड शो सुरू होता. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्यावरून टिकास्त्र सोडले. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राफेलचे पोस्टर हाती घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोड शो दरम्यान राफेल मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राफेल विमानांच्या करारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना समोरासमोर चर्चेचे पुन्हा एकदा आव्हान दिले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांकडून ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी करवून घेतली.

प्रियंकांची एन्ट्री दमदार, पण ‘या’ 5 आव्हानांचा कसा करणार सामना?
28 वर्षांत जिंकता न आलेलं लखनौ प्रियंका गांधींनी पहिल्या रोड शोसाठी का निवडलं?

काँग्रेस आता फ्रंटफूटवर खेळणार
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आता काँग्रेस फ्रंटफ्रूटवर खेळणार असून यूपीमध्ये सरकार स्थापन करेपर्यंच शांत बसणार नाही असी घोषणा केली. उत्तर प्रदेश हिंदुस्थानचे ह्रदय असून यासाठी प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना सरचिटणीस केल्याचे राहुल गांधी म्हणाले. प्रियंका गांधी यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे यूपीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या