जावेद अख्तर यांच्या आक्षेपावर नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मात्याचं स्पष्टीकरण

1

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील नरेंद्र मोदी या चरित्रपटातील एका गाण्याच्या संदर्भात गीतकार जावेद अख्तर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्या आक्षेपाविषयी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत फक्त टीसीरीजशी बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अख्तर यांना त्यांच्या नावाच्या समाविष्ट होण्याची कल्पना होती की नाही, याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

विवेक ओबेरॉय अभिनित नरेंद्र मोदी या चरित्रपटातील एका गाण्याच्या संदर्भात गीतकार जावेद अख्तर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलेलं नव्हतं, तरीही श्रेयनामावलीत त्यांचं नाव दाखवण्यात आलं होतं. या आक्षेपावर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, जावेद अख्तर यांची गाणी अतिशय प्रिय असल्याने त्यांना चित्रपटात एखादं गाणं अख्तर यांनी लिहावं असं वाटत होतं. त्यांनी टी सीरीजच्या भूषण कुमार यांना तसं सांगितलं होतं. भूषण कुमार यांनी ही मागणी पूर्ण करण्याबाबत सहमतीही दर्शवली होती. मात्र, याबाबत जावेद अख्तर यांना कल्पना देण्यात आली की नाही, याची काहीही माहिती आपल्याला नाही. वास्तविक ही जबाबदारी म्युझिक कंपनी म्हणून टी सीरीजची आहे, असं स्पष्टीकरण सिंग यांनी दिलं आहे.