प्रा. रामनाथ चव्हाण

4

मेधा पालकर

आपल्या चतुरस्र लेखणीने दलित साहित्य आणि मराठी साहित्य विश्वात प्रा. रामनाथ चव्हाण यांनी वेगळा ठसा निर्माण केला. नुकतेच त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख, महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. भटक्या विमुक्तांचे जग आपल्या लेखणीतून दाखवून देणारा साहित्यिक अचानक निघून गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दलित चळवळीतील आघाडीचे लेखक असलेल्या चव्हाण यांचा जन्म बारामती तालुक्यातील कोऱहाळे खुर्द येथे झाला. संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि क्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. ‘भटक्या-किमुक्तांची जातपंचायत’ हे पाच खंडांत प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्काचा दस्ताकेज आहे. ‘जाती क जमाती’ हेही त्यांचे एक महत्त्काचे पुस्तक असून त्याचा जपानी भाषेतही अनुकाद झाला आहे. याचबरोबर भटक्या किमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱयाची माणसं, गावगाडा: काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेकरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

भटक्या विमुक्तांचे जग व त्यांचे जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. तब्बल ३०वर्षांहून अधिक काळ त्यांनी या विषयासाठी अकिचल निष्ठेने स्वतःला वाहून घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी पदरमोड करून भरपूर भटकंती केली. भटक्या-विमुक्तांच्या पालावर, तांडय़ांवर आणि वस्त्यांकर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जकळीक निर्माण करून त्यांच्या मुलाखतींतून, भटकंतीतील निरीक्षणांतून या जमातींविषयी भरपूर माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचे पूर्वेतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विकाह संस्कार, काडीमोड, इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशिलात माहिती गोळा केली. त्याच माहितीतून त्यांचा ‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हा दस्तावेज पाच खंडांत प्रसिद्ध झाला.

भटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घेण्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच या विषयाच्या संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्काचा दस्ताकेज ठरला. पुण्याच्या ‘देशमुख आणि कंपनी’ या प्रकाशन संस्थेने हे खंड प्रकाशित केले आहेत. २००२ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या खंडात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, पारधी अशा ११जमातींवर लिखाण केले आहे. २००४ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱया खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसाकी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातींवर तर २००६ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱया खंडात नंदीबैलकाले, गाढकगोती बेलदार, रायरंद, मरीआईकाला, बहुरूपी, नाथपंथी राकळ या सहा जमातींकर लिखाण केले आहे. २००८ साली प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरकट, घ्यारे कंजर, डक्कलकार अशा सात जमातींचा अभ्यास समाकिष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचक्या खंडात दरकेशी, लोहार, तिरमल, बागडी, केडूकाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातींकर केलेला अभ्यास आहे.

उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. प्रा. चव्हाण यांनी विविध संस्थांचा कार्यभार सांभाळला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाउंडेशन, दलित साहित्य संशोधन संस्था, दलित नाटय़ संकुल, नाशिक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठान, आकाशवाणी पुणे केंद्र सल्लागार समितीचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, प्रौढ प्रशिक्षण तदर्थ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.