‘पद्मावती’ सिनेमाचे प्रदर्शन थांबवा

सामना ऑनलाईन । धुळे

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संजय भन्साली यांनी ‘पद्मावती’ या चित्रपटात आणि ‘पद्मावती’संदर्भात दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्वीही भन्साली यांनी ‘जोधा अकबर’ या चित्रपटात राजपूत समाजासंदर्भात चुकीची माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन होऊ नये; अन्यथा राजपूत समाज तीव्र आंदोलन करेल, असे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

चित्रपट दिग्दर्शक संजय भन्साली यांची निर्मिती असलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटासंदर्भात काही माहिती पुढे आली आहे. त्यात राजपूत समाजाची अस्मिता असलेल्या पद्मावतीसंदर्भात चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत. त्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदन देताना डॉ. दरबारसिंग गिरासे, खंडू भिल, जितेंद्र गिरासे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.