शिर्डीत साईबाबा रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोपट गोसावी (45) या साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. मात्र डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आहे. आंदोलकांनी साईबाबा रुग्णालयातील डॉक्टर कोरडे आणि डॉ. घोडगे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

गोसावी हे दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे साईबाबा रुग्णालयात प्रथोमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक किंवा पुणे येथे नेऊ द्या, अशी नातेवाईकांनी मागणी केली होती. मात्र डॉक्टरांनी पेशंट हलवण्यास नकार दिल्यामुळेच तो दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आरोपी डॉक्टरांच्या निषेधार्थ नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.