दाऊदचे हॉटेल पाडून सार्वजनिक शौचालय उभारणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची कार लिलावात विकत घेऊन ती जाळून टाकणारे अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी आता दाऊदच्या हॉटेलला लक्ष्य केले आहे. दाऊदचे भेंडीबाजार येथील ‘रौनक अफ्रोज’ हे हॉटेल विकत घेऊन तेथे सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

येत्या १४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकार दाऊदच्या प्रॉपर्टींचा लिलाव करणार आहे त्यात भेंडीबाजार येथील ‘रौनक अफ्रोज’ म्हणजेच ‘दिल्ली जायका’ या हॉटेलसाठी बोली लावण्यात येणार आहे. त्या लिलावात सहभाग घेऊन ‘स्वामी चक्रपानी’ हे हॉटेल रौनक अफ्रोजसाठी बोली लावणार आहेत.