Pulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी होत आहे. त्य़ा पार्श्वभूमीवर येत्या 25 फेब्रुवारीला संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत पाकिस्तानविरोधात मोठा प्लान आखण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपीन रावत, हवाई दल प्रमुख बिरेंदर सिंग धनाओ, नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्यासह या दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. यावेळी पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याचे उत्तर कसे द्यायचे यावर प्रामुख्याने चर्चा होणर असल्याचे समजते. तसेच अमेरिका, इस्रायल, रशिया या व इतर मित्र देशांच्या लष्करासोबत कशा प्रकारे संबंध आहेत याचा देखील आढाव घेतला जाईल.