तंबाखू थुकायला गेला आणि फटक्यात मेला… कसा ते वाचा सविस्तर

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

बांधकाम साईटवर बॉबकेट मशीनचे (छोटा जेसीबी) माती उचलून टाकण्याचे लोखंडी बकेट डोक्यात पडून चालकाचा मृत्यू झाला. हा चालक वारंवार तंबाखू थुंकण्यासाठी उठत होता. यादरम्यान चुकून एक्सलेटरवर पाय पडल्याने बकेट खाली येऊन त्याच्या डोक्यात आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. कात्रज भागातील सुखसागरनगर येथे ही घटना घडली. सुरज गोविंद कसबे (वय २४, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. १९ ऑक्टोंबरला हा अपघात झाला होता आणि उपचारादरम्यान कसबे यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील श्री गुरु अपार्टमेंट शेजारी बॉबकेट मशीनने माती लेव्हल करण्याचे काम सुरू होते. कसबे हा बॉबकेट मशीन चालवत होता. तो तंबाखु थुंकण्यासाठी सतत डोके बाहेर काढत होता. थुंकत असताना त्याचे मशीनच्या एक्सलेटरवर पाय लागल्यामुळे बकेट खाली येऊन त्याच्या डोक्यात आदळले. याप्रकरणी उपनिरीक्षक देवकाते पुढील तपास करत आहेत.