पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधानांना लिहिली रक्ताने पत्रं

1

सामना ऑनलाईन । पुणे

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुण्यात जवळपास 50 काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिली आहेत. या हल्ल्याला पंतप्रधान मोदी सरकार जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच ‘खून का बदला खूनसे’ घ्या, 40 गेले आहेत, त्यांच्या बदल्यात 4 हजारांना ठार करा, पाकड्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अशी मागणीही त्यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रात केली आहे.