पुणे:- ‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

271
century-enka-bhosari

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील भोसरी येथील ‘सेंच्युरी एन्का’ कंपनीच्या काही भागात आग लागली आहे. मंगळवारी सकाळी आगीच्या घटनेनंतर परिसर रिकामा करण्यात आला असून अग्निशनम दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील कंपनीच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सेंच्युरी एन्का ही भोसरीमधील मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या एका भागात गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास आग लागली. त्यामुळे तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच 5 गाड्या येथे दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले असून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या