राज्यात अवयवदानात पुणे नंबर वन!

1

सामना ऑनलाईन । पुणे

पुणे तिथे काय उणे!.. असं म्हटलं जातं. पुणेकरांनी ही म्हण खरी करून दाखवली आहे आणि अवयवदानामध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. अवयवदानामध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. अवयवदानात पुणे देशपातळीवर ५४व्या स्थानी आहे तर मुंबई ५९व्या स्थानी आहे. पुण्यात १९८८ साली पहिल्यांदा अवयवदान झालं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये म्हणजे जवळपास २५ वर्षांनी अवयवदान झालं, तर पहिल्यांदा हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया २०१७ साली झाली.

राज्यात मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर येथे विभागीय प्रत्यारोपण समित्या आहेत. पुणे विभागातर्फे ४२ किडनी, यकृत २८, हृदय ६ व प्रॅन्क्रियाजचे १ प्रत्यारोपण झाले. मुंबई समितीमार्फत किडनी ३४, यकृत २२, हृदय १६ आणि एका फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाले. संभाजीनगर समितीमार्फत किडनी ६, हृदय १ तर, नागपूर विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत मूत्रपिंडे १२ व यकृत ३ असे प्रत्यारोपण झाले.