मी ज्योतिषी नाही अन् पोपटालाही विचारले नाही -अजित पवार

106

सामना प्रतिनिधी । पुणे

लोकसभा निकडणुकीत आमच्या किती जागा येतील हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही किंवा पोपटालाही त्याबाबत विचारलेले नाही’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणे अवघड असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संकाद साधला.

अजित पवार म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट हा ‘अंडर करंट’ कुणालाही कळला नव्हता. ना भाजपला ना आम्हाला ना मीडियाला. एक्झिट पोलचे अंदाज खरेच ठरतील असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या काही उमेदवारांनी निकालाच्या आधीच लाडू तयार करायला घेतलेत असे निदर्शनास आणून दिल्यानंतर कुणी ‘लाडू’ तयार करावेत का काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण यातून संबंधितांचा अतिआत्मकिश्वास दिसतोय असे मत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या