पुण्यात गारठा कायम

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । पुणे

किमान तापमानात चढ-उतार सुरू असले तरी राज्यातील गारठा मात्र कायम आहे. रविवारी पुण्यात किमान तापमानात थोडीशी वाढ होत पारा ९.९ अंशांवर गेला होता. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली उतरले आहे. गोंदिया येथे राज्यातील निचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

राज्यातील प्रमुख ठिकाणांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ९.९, जळगाव ११.६, कोल्हापूर १५.०, महाबळेश्वर १३.६, मालेगाव ११.८, नाशिक ९.२, सांगली १२.६, सातारा ११.०, सोलापूर १२.६, मुंबई १९.८, अलिबाग १७.४, रत्नागिरी १६.८, संभाजीनगर १०.६, परभणी १०.६, नांदेड १२.०, धाराशिव ९.१, अकोला ११.३, अमरावती १३.४, बुलढाणा १४.२, ब्रह्मपुरी ८.९, चंद्रपूर १०.६, नागपूर ९.९, वर्धा १०.५, यवतमाळ १२.४.