लग्नाच्या स्वागत समारंभाचा खर्च टाळत शाळा आणि मंदिराला दिली 71 हजाराची देणगी

108

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

लग्नानंतर होणाऱ्या स्वागत समारंभावरचा वायफळ खर्च टाळत ते पैसे शाळा व मंदीरासाठी देणगी म्हणून देण्याचे मोठेपण येथील शिरूर तालुक्यातील पोपट सोपाना गदादे यांनी दाखवले. स्वागत सभारंभावर खर्च होणारे 71 हजार रुपये त्यांनी मंदिर व शाळेला देणगी म्हणून दिले. या स्तुत्य उपक्रमातून गदादे यांनी समाजासमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

शिरूर तालुक्यातील तांदळी येथे राहणारे गदादे यांच्या मुलाचे लग्न होते. पण यावेळी आपल्या मुलाच्या स्वागत समारंभावरचा अनावश्यक खर्च टाळून त्यातून समाजकार्ये करण्याची इच्छा त्यांनी कुटुंबांसमोर व्यक्त केली. घरच्यांनाही ती आवडली. त्यानंतर गोदादे कुटुंबांने सावता माळी मंदिरासाठी 51000 रुपये व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी 21000 रुपये देणगी देणगी दिली
.
सावतामाळी मंदिरा साठी दिलेला धनादेश दौंड पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ भाऊ फुलारी यांच्या हस्ते तांदळीच्या सावतामाळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास बापू गदादे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा धनादेश पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे किसन मोर्चाचे अध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्या हस्ते मुख्याध्यापक मानसिंग वाकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पूर्वभागातील शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे,परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. पोपट गदादे यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या आदर्शवत उपक्रमाचे परिसरातून कौतूक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या