पुण्यात नरेंद्र मंडळाने डीजे बंदीचा नोंदवला निषेध

5

सामना ऑनलाईन । पुणे

नरेंद्र मंडळाने डीजे बंदीचा निषेध नोंदवून धर्माच्या नावाने दररोज ध्वनी प्रदूषण होते त्यावर टीका केली आहे. यंदाही बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत काढणार होतो पण विद्यमान दरबारींच्या काही चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ध्वनीप्रदूषण नको म्हणून साऊंड नाही लावले, थर्माकॉल, प्लॅस्टिकचे प्रदूषण नको म्हणून देखावा नाही, पीओपीमुळे प्रदूषण नको म्हणून मूर्तीही फायबरची बसवली, हे सुद्धा नको असल्यास पुढच्या वर्षी फ्लेक्सची स्थापना करू असा उपहासात्मक बॅनर नरेंद्र मंडळाने लावला आहे.