VIDEO: श्रावणी पुत्रदा एकादशीसाठी पंढरपुरात प्रचंड गर्दी

सामना ऑनलाईन । पंढरपूर

आषाढी एकादशी नंतर बुधवारी आलेल्या श्रावणी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.यानिमित्त जवळपास तीन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकादशीनिमित्त चंद्रभागास्नानासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे.

पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची दर्शन रांग ही गोपाळपूर रोडपर्यंत गेली आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या निमित्ताने आपल्या मनोकामना घेऊन भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतात. हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीच्या व्रताचे महत्व मोठे आहे. या एकादशीला व्रत केल्याने अपत्य प्राप्ती होते,पुण्य लाभते, माणूस धनवान, विद्वान,तपस्वी होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.