देवरुखात अजगराने शेळीला गिळले

सामना ऑनलाईन, देवरूख

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळच्या हातीव गावात अजगराने शेळीला गिळल्याची घटना समोर आली आहे. या गावात राहणाऱ्या  बुधाजी घोगले यांच्या  शेळ्या चारण्यासाठी एक महिला रानात गेली होती. यावेळी झुडपात लपून बसलेल्या अजगराने शेळीला आपलं लक्ष बनवलं. अजगराने घातलेल्या विळख्यामुळे शेळीचा मृत्यू झाला होता.या घटनेमुळे रामामध्ये गुरं तसंच शेळ्या मेंढ्या चारायला नेणारे घाबरले आहे.