कपिल, धोनीच्या जगज्जेत्या संघांना फिफा वर्ल्डकपसाठी निमंत्रण

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

कतारमध्ये 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा फुटबॉल संघ पात्र ठरलेला नाही. मात्र  कपिल देव (1983) आणि महेंद्रसिंग धोनी (2011) यांच्या जगज्जेत्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. 2022 स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे आमंत्रण दिले.

नासेर अल खाटेर म्हणाले, कतारमध्ये 2022 मध्ये होणारा फिफा वर्ल्ड कपचा आनंदोत्सक साऱ्यानी एकत्रपणे साजरा करायला हवा. हिंदुस्थानमध्ये क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ आहे याची मला कल्पना नक्हती. 1983 आणि 2011 मधील विश्वचषक विजेत्या हिंदुस्थानी क्रिकेट संघांतील काही खेळाडू येथे उपस्थित आहेत. मी त्यांना ओळखतो. त्यामुळे मी स्वत: या दोनही संघांच्या खेळाडूंना ‘फिफा’कडून विशेष आमंत्रण देतो, असे खाटेर म्हणाले.