पतीच्या मृत्यूमुळे लैंगिक सुखाला मुकतेय, पत्नीची रुग्णालयाकडे 8 कोटींच्या भरपाईची मागणी

सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन

एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा मृत्यू झाला तर ती संस्था किंवा संघटना त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. परंतु पतीच्या मृत्यूमुळे सेक्स लाईफवर परिमाण झाला म्हणून कोणी सरकारकडे पैसे मागितले असे ऐकले आहे का? ऐकण्यास विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या कॅरा फिनेगन हिने ब्रिस्बेन रुग्णालयाकडे 1.2 मिलियन डॉलर (8 कोटी 53 लाख) मागितले आहेत.

कॅरा फिनेगन हिचा पती जॅमी याचा गेल्या वर्षी ब्रेन डॅमेजमुळे मृत्यू झाला. त्यावेळी असे लक्षात आले होते की, येथील एका डॉक्टराच्या सहा वर्षापूर्वीच्या चुकीमुळे त्याच्यावर ही परिस्थिती ओढावली होती. पतीच्या मृत्यूनंतर कॅरा चार मुलांचे एकटी संगोपन करत आहे. अर्थात रुग्णालयाने यापूर्वी कॅराला 10 मिलियन डॉलरची (70 कोटी) मदत केली आहे. परंतु आता तिने पतीच्या निधनामुळे माझ्या सेक्स लाईफवर परिणाम झाल्याचे सांगत आणखी पैसे मागितले आहेत.

कॅराच्या या मागणीला तिच्या आईचा देखील पाठिंबा आहे. तिच्या मते रुग्णालयाने दिलेले पैसे कमी असून आणखी पैसे देण्यात यावे. कारण रुग्णालयाने दिलेले 10 मिलियन डॉलर्सपैकी 8 मिलियन डॉलर्स मुलांसाठी ट्रस्टमध्ये जमा करण्यात आले आहेत. मुलं 25 वर्षाची होतील त्यावेळी हा पैसा त्यांना मिळेल.