बास्केटबॉल खेळणारा ससा

सामना ऑनलाईन, लास वेगास

बऱ्याच जणांचा बास्केट बॉल हा आवडीचा खेळ असेल. पण कधी ससा बास्केटबॉल खेळताना पाहिलयं का…? कॅलिफोर्नियातील एक ससा चक्क बास्केट बॉल खेळत असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दखल घेतली आहे.

हा ससा खूपच हुशार असून तो एका मिनिटांत तब्बल सात वेळा खेळतो. हा ससा खूपच क्रिएटिव्ह असून तो चित्रेही फार छान काढतो. या सशाचा मालक साई असोर यांनी सांगितले की, प्रसिद्ध खेळाडू मायकल जॉर्डनप्रमाणे हा ससा बास्केटबॉल खेळतो.