हाऊसफुल्ल- तिघाडा आणि काम बिघाडा


वैष्णवी कानविंदे-पिंगे

कथा ओळखा आणि पैज जिंका अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली तर त्या स्पर्धेतील कुटील प्रश्न म्हणून ‘रेस ३’ वर्णी अगदी नक्की लागू शकते. या सिनेमात काय आहे यापेक्षाही या सिनेमात काय नाही या बाबीचा जास्त विचार करावा लागेल. यात हीरो आकाशातून, पातळातून, जमिनिवरून, जमिनीच्या आतून, आगीतून, वादळातून कुठूनही येतो. कितीही शत्रू असले तरी त्यांचा चुथडा करू शकतो. काहीही करू शकतो आणि त्यात भर म्हणून तो हीरो सलमान खान असल्याने विचारता सोय नाही. यात सगळं होतं, सगळ्या प्रकारची अवजारं, वाहनं सगळे जण चालवू शकतात. कितीही भयानक मारामारी सगळेच जण करू शकतात वगैरे वगैरे. सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा नेत्रदीपक सोहळा सुरू राहतो, पण लेखक-दिग्दर्शकाचं खरं कसब म्हणजे हे सगळं संपलं तरीही या सिनेमाची कथा काय आहे हे एक सलगपणे अजिबात सांगता येत नाही… असो.

तर, ‘रेस ३’ या सिनेमाची कथा म्हणजे अगदीच काही म्हणजे काहीच कळत नाही. त्यात सुरुवातीला कोणता तरी भारीतला स्टंट सीन होतो. तो पाहताना डोळे दिपतात आणि नंतरही ते दिपलेले डोळे इतके चुरचुरतात की, विचारता सोय नाही. या सिनेमाच्या सुरुवातीला कोण तरी या कुटुंबाची माहिती देतं. एक बाप, त्याची तीन मुलं, बापाचा बॉडीगार्ड, मुलाचा बॉडीगार्ड हे कुटुंब. मग एक गर्लप्रेंâड आणि मग त्यातलं कोण कोणाचं काय करतंय, कोण कोणाबरोबर धावतंय हे सगळं म्हणजे हा सिनेमा. आधीच्या दोन्ही सिनेमांतला पॅटर्न तसाचा तसा घेऊन त्यात नवीन पात्र, नवीन वातावरण आणि या सगळ्याची नवी संरचना करून मांडली की, रेसचा आणखी एक नमुना तयार होईल असा ओव्हरकॉाqन्फडन्स मेकर्सना असल्याचं हे उदाहरण, पण हा सिनेमा अति चकचक यापलीकडे काहीही नाही. त्यामुळे सिनेमा पाहत असताना अपेक्षा असते करमणुकीची आणि दिसत राहतो तो फक्त कोट्यवधी रुपयांचा होणारा चुराडा.

दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणावं तर भारी भारी दृष्यं एकत्र जोडल्याने कधीही महान सिनेमा तयार होऊ शकत नाही. ती नुसती दृष्यं प्रोमोपुरती बरी वाटतात, पण सिनेमाला गरज असते ती कथेची आणि कथाच नसेल तर सिनेमा प्रेक्षकाला खिळवून ठेवूच शकत नाही आणि कितीही मोठे स्टार किंवा कितीही बडी लोकेशन्स, गाड्या आणि इतर सगळं आणलं तरी तो सिनेमा वाचू शकत नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन जितवंâ वरवरचं तितवंâच संकलनही. साधं गाडीवर हल्ला झाल्यावर गाडीचा दरवाजा तुटतो आणि दुसNयाच दृष्यात हीरो तो दरवाजा ऐटीत बंद करून गाडीत बसतो अशा प्रकारच्या असंख्य दृष्यांची यात भरणा आहे. शत्रू असो वा मित्र, पण फक्त दिग्दर्शकाला देखण्या वाटाव्या अशा प्रेâमसाठी एकत्र येणं आणि मग परत आपपल्या भूमिकेत जाणं हे सगळंच विचित्र वाटतं.

सुरुवातीच्या निवेदनात ज्याला डेंजर असं म्हटलं अशी जुळी भावंडं फक्त बिच्चारी आणि लल्लू पंजूची जोडी वाटत रहाते. बॉडीगार्ड म्हणून असलेला बॉबी देओलला पाहताच त्याला त्याच्या वयामुळे ही दगदग कशी झेपेल एवढाच प्रश्न मनात उरतो. अनिल कपूर पडद्यावर नेहमीच छान वाटतो, पण त्याच्या इतर सिनेमांसारखा मोकळेपणा यात कुठेच नाही. प्रत्येक दृष्यं डिझाईन केलं गेलं आणि त्यात त्याला बसवलं गेलं इतवंâच. जॅकलिन फर्नांडिसच्या हातात भले बंदुका वगैरे असतील, पण तिला या सिनेमात एक बाहुलीइतवंâच स्थान आहे आणि मुख्य कलाकार अर्थात सलमान खान. खरं सांगायचं तर सलमानचा करिश्मा आता कितीही काहीही केलं तरी दिसतच नाही. किंबहुना तो पडद्यावर दोन मिनिटांपेक्षा जास्त आला की वंâटाळा यायला लागतो. उपकार केल्यासारखे आठवत आठवत संवाद म्हणणं, टीशर्ट फाडणं या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. त्याचं सिनेमातलं वय जरी पस्तीस दाखवलं असलं तरीही पडद्यावरचा वावर मात्र खरं वय दाखवायला लागलाय हेच खरं.

गाण्यांना आणि गाण्यांच्या शब्दांनाही काहीही अर्थ नाही. आजकाल अशी गाणी दिवसाला पन्नास या हिशेबाने कानावर पडतात. त्याच्यात ना नावीन्य ना गुंतवण्याचं सामथ्र्य. ‘तुम दिल से नही डेल पुछो..’ सारखे अत्यंत दयनीय विनोद आणि अतिशय फुटकळ क्लायमॅक्स यांनी सजलेला हा सिनेमा प्रभाव पाडायला शंभर टक्के निकामी ठरतो. भले या सिनेमाची लोकेशन्स खरोखरच देखणी आहेत. सढळ हस्ते खर्च केलेला पैसा डोळ्यांना सहज दिसतो. स्टंट दृष्यं झक्कास आहेत आणि ती सर्व सिनेमाभर आहेत. या सिनेमात स्टार्सही आहेत, पण ही सगळी पुंजी म्हणजे बँक बांधलीय, घराला जमीन आहे, दरवाजा आहे, र्फिनचर आहे, पण वर छप्परच नाही अशी आहे. मुळात एकसंध, बांधील खमकी कथाच नसल्याने इतर कुठच्याही बाबींना काहीच अर्थ उरत नाही आणि सिनेमा प्रेक्षकाला गुंतवून ठेवायला अपयशी ठरतो आणि त्यामुळे ‘रेस ३’ची ही एवढी महागडी, उत्सुकता वाढवणारी रेस सुरू व्हायच्या आधीच रद्द झाल्यासारखी वाटते.

दर्जा -*

सिनेमा -रेस ३

निर्माता -रमेश तौरानी, सलमान खान

दिग्दर्शक -रेमो डिसोझा

कथा-शिराझ अहमद

संगीत -सलीम सुलेमान

कलाकार-सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शहा, साकीब सलीम, प्रेâडी दारूवाला, निशिगंधा वाड