मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहाणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, विखेंचा टोला

41

सामना प्रतिनिधी । संगमनेर

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहाणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होवून नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील संगमनेरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. तालुक्यातील खांडगाव येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना विखे पाटील म्हणाले, हा मुद्दाच आता राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला असल्याने पक्ष प्रवेशाची फक्त औपचारीकता राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेवून माझी वाटचाल सुरू असल्याकडे लक्ष वेधून मंत्रीमंडळ विस्ताराचा दिवस कधी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या