‘ओला’ ला दिवसाला सहा कोटींचा घाटा

1

सामना ऑनलाईन, मुंबई

ओला या टॅक्सी सेवेला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असली तरी या कंपनीला दिवसाला सहा कोटींचा घाटा होत आहे. एक रुपयाची कमाई आणि चार रुपयांचा खर्च अशा स्थितीत ओला टॅक्सी धावत आहे. प्रवाशांना चांगल्या सवलती आणि चालकांना भरघोस भत्ते यामुळे ही स्थिती आली आहे.

३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाला ओला कंपनीचा महसूल ७ पटींनी वाढला. मात्र त्याचवेळी २०१५-१६ या वर्षात २३१३.७ कोटींचा तोटा झाल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच्या वर्षी हा तोटा ७९६ कोटींचा होता. म्हणजे तीनपटींनी नुकसान वाढले आहे. सुरुवातीला कंपनीने ड्रायव्हर्सना मोठ्या प्रमाणात भत्ते दिले. हे भत्ते कमी केल्यापासून नुकसान थोडे कमी झालेले दिसत आहे.