मोदीजी तुम्ही देशासोबत गद्दारी केली आहे; राहुल गांधींची कडाडून टीका

2
rahul-gandhi-modi

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र यावेळचा त्यांचा पंतप्रधानांवरील हल्ला अधिक तिखट आणि जहाल आहे. राहुल गांधी यांनी ट्विटवर टीका करताना म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी एकत्रितरित्या देशाच्या सैन्यदलावर 130 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मोदीजी, देशासाठी रक्त सांडणाऱ्या शहीदांचा तुम्ही अपमान केला आहे. लाज वाटते तुमची, तुम्ही देशासोबत गद्दारी केली आहेत.

‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करारावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरले असतानाच फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राफेल करारासाठी मोदी सरकारनेच उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्सच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

राफेलवरील वाक्युद्ध

2015 मध्ये ओलांद फ्रान्सचे राष्ट्रपती होते. त्यांच्या काळातच 36 राफेल फायटर जेट खरेदीचा करार मान्य करण्यात आला होता. 7.87 अब्ज युरोचा हा करार आहे.

‘राफेल’साठी मोदी सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवले!

फ्रान्समधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी राष्ट्रपती ओलांद यांनी हा सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. हिंदुस्थानच्या कोणत्या कंपनीची निवड राफेल करारासाठी करावी यामध्ये फ्रान्सच्या ‘दॅसॉ एविएशन’ची कोणतीही भूमिका नव्हती. हिंदुस्थान सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव दिले. त्यानुसार ‘दॅसॉ एविएशन’ने रिलायन्सशी संपर्क केला. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितले.

हिंदुस्थानने ‘सुखोई’ विमाने बनवली; मग ‘राफेल’ का नाही, ‘एचएएल’च्या माजी प्रमुखांचा सवाल