‘द वॉल’च्या खेळीचे कौतुक पण वैयक्तिक नुकसान

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी खेळाडू ‘द वॉल’ राहुल द्रविडची मैदानाबाहेरची खेळी यशस्वी झाली आहे. ‘द वॉल’च्या या खेळीमुळे त्याला वैयक्तीक नुकसान झाले असले तरी त्याने घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मागील महिन्यात झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात हिंदुस्थानने अंतिम सामन्यात विजय मिळवत चषक उंचावला होता. युवा संघाच्या या कामगिरीवर खूष होत बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख, खेळाडूंना ३० लाख आणि सपोर्ट स्टाफला २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

अंडर-१९ : बक्षिसाच्या रकमेवरून नेटकऱ्यांची बीसीसीआयवर फटकेबाजी

छोटा पॅकेट बडा धमाका, ‘अंडर-१९’ स्टार झाले कोट्यधीश

हिंदुस्थानचा ‘अंडर-१९’मधील ब्रॅडमन आणि लाल रूमाल

बीसीसीआयने जाहीर केलेली रक्कम आपल्याला अमान्य असल्याचे राहुल द्रविडने म्हटले होते. संघाच्या विजयामध्ये प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचीही भूमिका महत्त्वाची असल्याने दोघांनाही बक्षिसाची रक्कम समान देण्यात यावी असे द्रविड म्हणाला होता. द्रविडच्या या मागणीला बीसीसीआयने हिरवा कंदील दाखवला असून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. यामुळे द्रविडचे २५ लाखांचे नुकसाने झाले आहे. मात्र त्याच्या या भूमिकवर आधी हैराण झालेल्यांनी आता त्याचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या